आजची वात्रटिका
-------------------
निवडणुकीचा स्वभाव
निवडणूक कोणतीही असो,
ती सर्वांची पोल खोलून जाते.
जे जे दडलेले आणि दडवलेले,
ते ते निवडणूक बोलून जाते.
जसे उघड्याला नागडे करते,
तसे नागड्याला उघडे करते.
निवडणूक कोणतीही असो,
जिकडे तिकडे झगडे करते.
ज्याची त्याला जागा दाखवून,
झाकल्या मुठीचा पचका करते !
निवडणूक कोणतीही असो,
दरवेळी लोकशाहीचा विचका करते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9102
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
23नोव्हेंबर2025

No comments:
Post a Comment