Sunday, November 16, 2025

एकला चलो रे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका



आजची वात्रटिका
-------------------

एकला चलो रे ...

आणा झाल्या,भाका झाल्या,
एक दुसरे को संभालकर लेलो रे.
तोपर्यंत वरून आवाज आला,
एकला चलो रे, एकला चलो रे.

एकला चलो रे, एकला चलो रे,
हा म्हणे कार्यकर्त्यांचा आवाज आहे.
हम सब एक है बोलण्याचा,
राजकीय आघाड्यांचा रिवाज आहे.

बचेंगे तो और भी लढेंगे....ला,
एकला चलोरे...ची जोड आहे !
स्वबळाच्या राजकीय खुमखुमीला,
एकला चलो रे.... ची खोड आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9095
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
16 नोव्हेंबर2025
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...