Monday, November 24, 2025

नाविलाज.... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका


साप्ताहिक 
वात्रटिका
-----------------------------

नाविलाज 

वर वेगळा स्टॅन्ड आहे, 
खाली वेगळाच स्टॅन्ड आहे.
कुणाकुणाचा स्थानिक नेत्यांना, 
उघड उघड फ्री हॅन्ड आहे. 

कुणाचा विरोधाला विरोध, 
कुणाचा सहेतुक बाय आहे.
कुठे फ्रीहँड मिळाल्यामुळेच, 
आपल्याच पायात पाय आहे.

कुठे कुठे चढाया आहेत,
कुठे मैत्रीपूर्ण लढाया आहेत!
तरीही ऐक्याच्या मात्र, 
सगळीकडूनच बढाया आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा 
वात्रटिका - 61
वर्ष- दुसरे
22नोव्हेंबर 2025

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...