आजची वात्रटिका
-------------------
इकडूनही तेच लढत आहेत,
तिकडूनही तेच लढत आहेत.
तरीही काट्याच्या लढती,
अशा बातम्या झडत आहेत.
जसे त्यांचे वेगळे चिन्ह आहे,
तसे यांचेही वेगळे चिन्ह आहे.
प्रचार आणि अपप्रचार वेगळा,
पण इरादा कुठे भिन्न आहे ?
टीका आणि प्रतिटिकाही,
तात्पुरत्या आणि फेक आहेत !
कालही ते एक होते,
आज आणि उद्याही ते एक आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9103
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
24नोव्हेंबर2025

No comments:
Post a Comment