Thursday, November 20, 2025

राजकीय लवचिकता....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

राजकीय लवचिकता

राजकारण हे राजकारण आहे,
राजकारणात कुणीही संत नाही.
विश्वासघात आणि फाटाफुटीला,
म्हणूनच इथे कधीही अंत नाही.

म्हणूनच सर्वच राजकारण्यांना,
कुणाच्या विश्वासघाताची खंत नाही.
इथे सगळेच ढोबळ ढोबळ,
काहीही अगदी तंतोतंत नाही.

तुम्हाला आम्हाला जेवढी वाटते,
तेवढी राजकारणात गुंतागुंत नाही !
सर्वांनाच सर्व पर्याय खुले
अवती भवती राजकीय भिंत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9099
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
20नोव्हेंबर2025
 

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...