Tuesday, November 11, 2025

नो गॅरंटी ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

नो गॅरंटी

कुणालाही कधीच कशाची,
राजकारणात गॅरंटी असत नाही.
ज्याची झाली उलथापालथ,
त्याचाच त्यावर विश्वास वसत नाही.

जेवढ्या वेगाने वर जाऊ शकता,
तेवढ्याच वेगाने खाली येऊ शकता.
हा अत्यंत टोकाचा अनुभव,
तुम्ही राजकारणातच घेऊ शकता.

म्हणूनच गॅरंटी वॉरंटीच्या गोष्टी,
कुणीच कधी बोलताना दिसत नाही!
कुणाचेही यश आणि अपयश,
एकाच मापात तोलताना दिसत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9090
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
11 नोव्हेंबर2025
 

No comments:

विश्वास अविश्वास....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------- विश्वास अविश्वास सत्तेसाठी साम-दाम-दंड-भेदाचे, सगळेच्या सगळे मार्ग धुंडले जातात. निवडून आलेले...