Wednesday, November 5, 2025

मतदारांचा संवाद.... आजची वात्रटिका


आजची वात्रटिका 
--------------------------

मतदारांचा संवाद

दुबार म्हणाला तिबारला,
आपण आता 'स्टार' झालो.
मतदान यादीच्या कागदाला,
आपण जरी भार झालो.

नावापुढे 'स्टार' लागणार, 
त्याचे वेगळेच वलय आहे !
प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार, 
त्यात कसला प्रलय आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
----------------------------
आजची वात्रटिका - 15
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
5 नोव्हेंबर 2025
----------------------------
पुढील लिंक क्लिक करून माझ्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करू शकता किंवा भेट देऊ शकता.
https://whatsapp.com/channel/0029Vb6SsxH0gcfSYNSWgo1s

No comments:

राज्यसभेची तुतारी .....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- राज्यसभेची तुतारी विलीनीकरण होणार की नाही? प्रश्न तुमच्या आमच्या समोर उभा आहे. त्यांच्या टारगेटव...