आजची वात्रटिका
-------------------
निवडणूक
निकालाचे धक्के
कुणाचा विश्वास झाला पक्का,
कुणाचा विश्वास मात्र उडू लागला.
निवडणुकीच्या निकालानंतर,
सारखाच प्रकार पुन्हा घडू लागला.
विश्वास आणि अविश्वासाचे,
ज्याचे त्याचे वेगळे कारण आहे.
परस्पर विरोधी दाव्यामध्ये
बिचाऱ्या ईव्हीएमचे मरण आहे.
विजय तर सर्वांनाच मान्य असतो,
पराभवसुद्धा मान्य व्हायला पाहिजे !
विजयाबरोबर पराभवाचेही कारण,
नम्रतेने समजून घ्यायला पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9094
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
15 नोव्हेंबर2025

No comments:
Post a Comment