Wednesday, November 19, 2025

मोसमी ओळख....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
मोसमी ओळख
आखून ठेवलेल्या डावाचे,
जेव्हा खेळखंडोबा होऊ लागतात.
तेव्हा निवडणूक काळामध्ये,
सर्वत्र बंडोबा जन्म घेऊ लागतात.
अन्याय,अपमान आणि नाराजी,
निवडणूक काळात ठळक होते.
ज्याची त्याला स्वतःची स्वतःलाच,
निवडणूक काळातच ओळख होते.
एकदा निवडणूक संपली की,
नाराजीही गुंडाळून ठेवली जाते !
निष्ठावंतांची जुनी शाल पांघरून,
सुरक्षित जागा धुंडाळून ठेवली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9098
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
19 नोव्हेंबर2025

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...