Monday, November 24, 2025

झुकवा झुकवी

आजची वात्रटिका
----------------------------
झुकवा झुकवी
कुणाकडे जातीचे कार्ड आहे,
कुणाकडे धर्माचे कार्ड आहे.
वेगवेगळ्या कार्डाने ग्रासलेले,
प्रत्येक वॉर्ड आणि वॉर्ड आहे.
ज्याने त्याने प्रत्येक वॉर्डवर,
आपापले जाळे टाकलेले आहे !
विकासाचा मुद्दा सोडून,
वॉर्ड सगळीकडे झुकलेले आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
आजची वात्रटिका - 31
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
24 नोव्हेंबर 2025

 

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...