Thursday, November 6, 2025

आचार संहिता इफेक्ट.....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

आचार संहिता इफेक्ट

पुतळ्यांची झाली झाकाझाकी,
काढले गेले राजकीय झेंड्याला.
आचारसंहितेने आपला खुट्टा उपटला,
झेंड्याचा दांडा म्हणाला दांड्याला.

काही काळ नंगानाच दिसणार नाही,
पुतळ्यानेही सुस्कारा सोडलेला आहे !
आपल्यालाही फटका बसू शकतो का?
गंभीर विचारात तिरंगा पडलेला आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
आजची वात्रटिका - 16
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
6 नोव्हेंबर 2025

 

No comments:

आंदोलन संदेश.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- आंदोलन संदेश कधी वाटले उपोषण, कधी वाटले मोर्चा आहे. दिल्लीतल्या आंदोलनाची, गल्लोगल्ली चर्चा आहे. आंदोलना...