खड्ड्यांचे खोदकाम
कुणी डोक्यावर चढू लागले की,
त्याला पायाखाली घेतले जाते.
विरोधकांना हाताशी धरून,
विरोधाला खतपाणी घातले जाते.
संधीची वाट बघून बघून,
आपला डाव बरोबर साधला जातो.
स्वतःची पर्वा न करता,
दुसऱ्यासाठी खड्डा खोदला जातो.
दुसऱ्यासाठीच्या खड्ड्यांचे खोदकाम,
अगदी सगळीकडेच जोरात आहे !
त्यांनी काळजी घ्यायला हरकत नाही,
ज्यांची कारकीर्द ऐन भरात आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा
वात्रटिका - 60
वर्ष- दुसरे
15नोव्हेंबर 2025

No comments:
Post a Comment