आजची वात्रटिका
-------------------
राजकीय आजारपण
कुणी आजारी पडले जाते,
कुणाला आजारी पाडले जाते.
राजकीय प्रकृतीनुसार,
राजकारणात हे घडले जाते.
जेवढे आजारपण रहस्यमय,
तेवढेच आजारपण व्रात्य असते.
सार्वजनिक संपर्क टाळणे,
हेच आजारपणाचे पथ्य असते.
राजकारणाशी ब्रेक अप असते,
राजकारणाचे चेकअप असते !
राजकीय वातावरण निवळताच,
आजारपणाचे पॅक अप असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9080
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
1 नोव्हेंबर2025

No comments:
Post a Comment