आजची वात्रटिका
-------------------------------
कुणाच्या आघाड्या;कुणाच्या युत्या,
कुणाचा आपला सवतासुभा आहे.
हे शोधणे खूप कठीण झाले,
नेमका कोण कुणाविरुद्ध उभा आहे?
शत्रु विरुद्ध मित्र,मित्रा विरुद्ध मित्र,
आघाड्यांच्या बिघाड्या झाल्या आहेत !
स्थानिकमुळे सगळेच पॅनिक होऊन,
बिघड्यांच्याही आघाड्या झाल्या आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 26
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
18 नोव्हेंबर 2025
No comments:
Post a Comment