साप्ताहिक वत्रटिका
------------------
शुद्ध बेशुद्ध
मतचोरीच्या आरोपाचे घोडे,
दुबार तिबारवर अडले आहे.
ईव्हीएम हॅकिंगचे प्रकरण,
केव्हाच मागे पडले आहे.
दुबार तिबार मतदारावरती,
सर्वच पक्षांचे ऐक्य आहे.
त्याचे सर्वपक्षीय लाभ झाले,
हेसुद्धा तितकेच शक्य आहे.
शुद्धता फक्त कागदावरती नाही,
ती राजकारणात आली पाहिजे !
आरोप प्रत्यारोपांची बेशुद्धता नको,
शुद्धता धोरणात आली पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा
वात्रटिका - 59
वर्ष- दुसरे
8 नोव्हेंबर 2025
No comments:
Post a Comment