Saturday, November 22, 2025

लोक 'शाही' व्यवहार

आजची वात्रटिका
-------------------------------
लोक 'शाही' व्यवहार
कुठे मतदारांचा जाहीर लिलाव,
कुठे पदांची जाहीर बोली आहे.
कुठे छुपी तर कुठे उघडपणे,
लोकशाही विकली गेली आहे.
लोकशाहीच्या खरेदी-विक्रीचा,
अगदी राजी खुशी मामला आहे !
लोकशाहीवाद्यांचा कंड,
लोकशाही मार्गाने शमला आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 30
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
22 नोव्हेंबर 2025

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...