Monday, November 3, 2025

जिवंत पुरावे


आजची वात्रटिका 
----------------------------

जिवंत पुरावे

जसे कुठे मतदार दुबार आहेत, 
तसे कुठे मतदार तिबार आहेत. 
आरोप काही निराधार नाहीत, 
मतदार यादीतून साभार आहेत.

आरोप फक्त एकपक्षीय नाहीत, 
आरोप सर्वपक्षीय झालेले आहेत !
कुठे कुठे तर मतदानाचा हक्क,
मृतात्मेही बजावून गेलेले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
----------------------------
आजची वात्रटिका - 13
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
3 नोव्हेंबर 2025
----------------------------

https://whatsapp.com/channel/0029Vb6SsxH0gcfSYNSWgo1s


No comments:

आंदोलन संदेश.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- आंदोलन संदेश कधी वाटले उपोषण, कधी वाटले मोर्चा आहे. दिल्लीतल्या आंदोलनाची, गल्लोगल्ली चर्चा आहे. आंदोलना...