Friday, November 14, 2025

निवृत्तीचे विचार.. . आजची वात्रटिका


आजची वात्रटिका 
----------------------------

निवृत्तीचे विचार

काय आपले कीर्तन आहे? 
काय आपले वर्तन आहे ?
लोकांचा म्हणजे नंगानाच,
आपले मात्र नर्तन आहे. 

लोकांची गुड्डी,आपला गुड्डा,
ही विसंगत प्रवृत्ती आहे !
आपल्या हातानेच आपली, 
कीर्तनातून 'निवृत्ती' आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 23
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
14 नोव्हेंबर 2025

 

No comments:

आंदोलन संदेश.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- आंदोलन संदेश कधी वाटले उपोषण, कधी वाटले मोर्चा आहे. दिल्लीतल्या आंदोलनाची, गल्लोगल्ली चर्चा आहे. आंदोलना...