Showing posts with label भविष्यवेत्त्यांचे भविष्य. Show all posts
Showing posts with label भविष्यवेत्त्यांचे भविष्य. Show all posts

Tuesday, March 31, 2026

भविष्यवेत्त्यांचे भविष्य....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------------
भविष्यवेत्त्यांचे भविष्य
जगातल्या तमाम भविष्यवेत्त्यांची,
करूण कहानी अगदी एक आहे.
भविष्यवेत्तेच सिद्ध करतात,
त्यांची भविष्यवाणी फेक आहे.
कुडमूड्यापासून कुंडलीवाल्यापर्यंत,
सारखाच अनुभव येऊन जातो.
एकदा ग्रह आणि तारे फिरले की,
सगळ्यांचाच पोपट होऊन जातो.
चेहरे ,हात आणि कार्ड पाहून,
कशाचेच उत्तर मिळालेले नाही !
इतरांचे भविष्य सांगणारांना,
स्वतःचेच भविष्य कळालेले नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9233
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
31मार्च 2026

 

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...