आजची वात्रटिका
----------------------------
लिंक पिसाट
व्हिडिओ मागे व्हिडिओ आहेत,
ते व्हिडिओ अगदी सुसाट आहेत.
जेवढे लिंगपिसाट मातळलेले,
तेवढे मातळलेले लिंकपिसाट आहेत.
लिंगपिसाट आणि लिंकपिसाट,
यांच्या मध्येही एक लिंक आहे.
तिथे तिथे त्यांचे डोळे विस्फारतात,
जिथे जिथे व्हिडिओत ब्लिंक आहे.
पिसाट ते पिसाटच असल्याने,
त्यांचा तोच प्रकार पुन्हा पुन्हा आहे !
जरी पीडितांचे फोटो फॉरवर्ड करणे,
हा दखलपात्र सायबर गुन्हा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9229
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
27मार्च 2026
