आजची वात्रटिका
--------------------------
राजकीय वाढदिवस
कार्यकर्ते आयोजक असतात,
कार्यकर्तेच प्रायोजक असतात.
नेत्यांच्या वाढदिवसांचे,
कार्यकर्तेच नियोजक असतात.
आवळा देऊन कोहळा,
कार्यकर्त्यांकडून काढला जातो.
सक्तीने आणि भक्तीने,
वाढदिवस पार पाडला जातो.
निवडणुकांच्या तोंडावरती,
वाढदिवसही वाढले जातात !
भावी अमुक;भावी तमुक,
डिजिटल बॅनर मढले जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8670
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
1 सप्टेंबर 2024
No comments:
Post a Comment