--------------------------
कळतंय पण...
धार्मिक आणि सामाजिक उत्सव,
राजकारणाच्या पथ्यावर पडतात.
भावी कार्यकर्ते आणि नेते,
आशा उत्सवांमधूनच तर घडतात.
राजकारणाचे रहस्यच,
जशी खाण तशीच माती आहे.
उत्सवामधल्या राजकारणाची तर,
अगदी सगळीकडेच ख्याती आहे..
म्हणूनच उत्सवामधले राजकारण,
किती टाळले तरी टळत नाही !
उत्सवाचे राजकारण करू नये,
कितीही कळाले तरी वळत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8679
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10सप्टेंबर 2024
No comments:
Post a Comment