आजची वात्रटिका
--------------------------
डीजे,लेझर आणि टिझर
कुणाला आला ॲटक,
कुणाचे डोळे गेले आहेत.
डीजे म्हणाला लेझरला,
लोकच खुळे झाले आहेत.
जशी गाणी अचकट आहेत,
तशी गाणी विचकट आहेत.
गाण्यांचा प्लस पॉइंट म्हणजे,
गाणी फक्त नाचकट आहेत.
थरारलेला डीजे आहे,
चमचमटलेला लेझर आहे !
गणपती मनाला भक्तांना,
सांभाळा हा फक्त टिझर आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8678
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9सप्टेंबर 2024
No comments:
Post a Comment