आजची वात्रटिका
--------------------------
नाराजी नाट्य
सत्तेचे वाटप करण्यात,
सत्ताधारी पक्ष बिझी असतात.
मंत्रीपदातून हुकलेले,
महामंडळाला राजी असतात.
महामंडळाचे गाजर,
नाराराजांपुढे टांगले जाते.
सत्ताधाऱ्यातले नाराजीनाट्य,
अगदी बारामाही रंगले जाते.
राजकीय सत्ता नाट्याचे
वेगवेगळे अंक असतात !
सत्ताधाऱ्यांच्या नावाने,
सत्ताधाऱ्यांचेच शंख असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8686
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
17सप्टेंबर 2024
No comments:
Post a Comment