Wednesday, September 4, 2024

फरार आरोपी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

फरार आरोपी

जणू आरोपींचे कायद्याशी,
प्रासंगिक करार झालेले असतात.
आरोपी कुठलेही असोत,
ते हमखास फरार झालेले असतात.

कायद्याच्या डोळ्यात धुळ फेकून,
आरोपींकडून लपंडाव खेळला जातो.
तेव्हा फरार या शब्दाचा,
अर्थ अगदी उघडपणे कळला जातो.

फरार असतात;करार असतात,
अटकेचेसुद्धा सुद्धा थरार असतात !
कायदा नावाच्या जोकरवर,
त्यांच्या रम्म्यासुद्धा आरार असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8673
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
4 सप्टेंबर 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 4जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 216 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 4जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 216 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1YiLs6xcuGuSxIcFWrRP...