Thursday, September 19, 2024

ज्याचा त्याचा मुख्यमंत्री प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

ज्याचा त्याचा मुख्यमंत्री

जसा यांच्या मनात एक आहे,
तसा त्यांच्या मनात एक आहे.
प्रत्येकाचा मुख्यमंत्री वेगळा,
इथेच तर सगळी मेख आहे.

लोकांच्या मनातला वेगळा आहे,
नेत्यांच्या मनातला वेगळा आहे.
आघाडी आणि युतीमधल्यांचा,
विचारही अगदी आगळा आहे.

प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे,
इथपर्यंत अगदी ठीक आहे !
निवडणुकीच्या पूर्वीच,
मुख्यमंत्री पदाचे पीक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8687
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19सप्टेंबर 2024
 

No comments:

निमताळेपणा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- निमताळेपणा नको त्या गोष्टी;नको तशा, जाती धर्मावरती नेल्या आहेत. जातीय आणि धार्मिक भावना, नको तेवढ्या कोम...