आजची वात्रटिका
--------------------------
पक्षांतराची थिअरी
इन्कमिंग आणि आउटगोइंगला,
सध्या सारखीच भरती आहे.
येणाऱ्या बरोबर जाणाऱ्यांनाही,
अगदी सारखीच स्फूर्ती आहे.
कुणी कुठे आले काय? गेले काय?
याचा कुणालाच फरक पडत नाही.
आयारामांचे स्वागत झाले तरी,
गयारामांवरही कोणी चिडत नाही.
आयारामांच्या आडोशाला,
भावी गयाराम दडलेले असतात !
त्यांचीच होते घर वापसी,
जे कुठेतरी सडले पडलेले असतात!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8691
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
23सप्टेंबर 2024

No comments:
Post a Comment