Friday, September 27, 2024

खुर्द आणि बुद्रुक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

खुर्द आणि बुद्रुक

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे,
आता बुद्रुक आणि खुर्द झाले.
ज्याचे जळते त्यालाच कळते,
कुणी मर्द तर कुणी सर्द झाले.

फोडणे सोपे जोडणे अवघड,
फोडणाऱ्यांनाही जाणीव आहे.
सगळे एकत्र आले तरी,
समन्वयाची मात्र उणीव आहे.

खुर्द आणि बुद्रुक केल्याचा,
अहंकार मनामध्ये दाटू नये !
आपण एवढीच प्रार्थना करू,
कुणाचेच घर कधी फुटू नये !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8695
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27सप्टेंबर 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 4जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 216 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 4जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 216 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1YiLs6xcuGuSxIcFWrRP...