आजची वात्रटिका
--------------------------
राजकीय दूरदृष्टी
जसे एका पक्षात अनेक घरे आहेत,
तसे एका घरात अनेक पक्ष आहेत.
सत्ता सलामत तो पक्ष पचास,
याबाबत राजकारणी दक्ष आहेत.
हेही तितकेच खरे की,
जशी दृष्टी तशी सृष्टी आहे.
प्रत्येक राजकीय घराण्याची,
केवढी राजकीय दूरदृष्टी आहे?
आपल्या राजकीय दूरदृष्टीमुळेच,
त्यांच्या हाती कायमची सत्ता आहे !
आपणच राजकीय आंधळे,
आपल्याला कुठे याचा पत्ता आहे?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8672
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
3 सप्टेंबर 2024
No comments:
Post a Comment