आजची वात्रटिका
--------------------------
बाप रे बाप !
सर्वच राजकीय घराण्यांमध्ये,
जणू परंपरागत मस्त्या आहेत.
त्यामुळेच घरातल्या घरात,
त्यांच्या राजकीय कुस्त्या आहेत.
प्रत्येक राजकीय घराण्यात,
जणू दालबराबर मुर्गी आहे.
बापाविरुद्ध केवळ पोरगाच नाही,
बापाविरुद्ध चक्क पोरगी आहे.
हे सांगता येणार नाही,
कोण कोणापेक्षा अडमुठे आहेत?
काका - पुतण्यांच्या संघर्षापेक्षा,
हे राजकीय संघर्ष मोठे आहेत !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8676
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7सप्टेंबर 2024
No comments:
Post a Comment