Sunday, September 29, 2024
राजकीय गुंडा-गर्दी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका--------------------------
राजकीय गुंडा-गर्दी
जिकडे बघावे तिकडे,
सगळीकडेच गुंडा-गर्दी आहे.
गुंडा-पुंडांच्या अंगावरती,
पांढऱ्या खादीची वर्दी आहे.
पांढरी खादी घातली की,
सर्व काळे डाग विरून जातात.
सब कुछ चलता है..
असेच गृहीत धरून जातात.
गुन्हेगारी आणि राजकारण,
एकमेकांना अगदी पूरक आहेत !
दोन्हीकडच्याही यशाचे,
दोघेही तेवढेच कारक आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8697
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
29सप्टेंबर 2024
Subscribe to:
Post Comments (Atom)
दैनिक वात्रटिका l 4जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 216 वा l पाने -45
दैनिक वात्रटिका l 4जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 216 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1YiLs6xcuGuSxIcFWrRP...
-
दैनिक वात्रटिका l 1जुलै2024 वर्ष- चौथे अंक -31वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1uyJXscqR7q8dBq9dK8bUAZB9r5...
No comments:
Post a Comment