Wednesday, September 11, 2024

माझी नवी ओळख...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

माझी नवी ओळख

आता अभिमानाने सांगत जाऊ,
आमच्या धडावर आमचे मस्तक आहे.
भारताचे संविधान म्हणजेच,
आमचे सर्वात आवडते पुस्तक आहे.

भारतीय हीच माझी जात,
भारतीय हाच माझा पहिला धर्म आहे.
पापा पुण्याचा हिशोब कशाला?
देशसेवा हेच माझे पहिले कर्म आहे.

विज्ञान हाच माझा गुरु,
विज्ञानाचाच मी पट्टशिष्य आहे !
जसा प्रथमही मी मनुष्य आहे,
तसा शेवटीही मी मनुष्य आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8680
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11सप्टेंबर 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 4जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 216 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 4जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 216 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1YiLs6xcuGuSxIcFWrRP...