आजची वात्रटिका
--------------------------
हम सब एक है
एखादा पक्ष फुटला तरी,
म्हणे एखाद्याचे घर फुटत नाही.
पण वास्तव अनुभवले की,
हे विधान अजिबातच पटत नाही.
आपल्या राजकारणामध्ये तर,
हीच घर घर की कहानी आहे.
जनतेला वेड्यात काढू नका,
जनता तशी खूप शहाणी आहे
राजकारणात नाती रक्ताने नाही,
सत्तेच्या खुर्चीने बांधली जातात !
एकदा सत्ता हातात असली की,
तुटलेली नातीही सांधली जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8693
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
25सप्टेंबर 2024
No comments:
Post a Comment