Friday, September 13, 2024

भावी उमेदवार....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

--------------------------

भावी उमेदवार

कुणी इच्छुक, कुणी लोचट,
कुणी कुणी तर हावरे आहेत.
कुणा कुणाच्या भेटीगाठी,
कुणाचे संपर्क दौरे आहेत.

जसे कुणाचे आहे स्वकर्तृत्व,
तशी आई-बापाची पुण्याई आहे.
कालचे अन्याय करते सांगती,
बघा मीच कसा न्यायी आहे ?

उपयोगिता आणि उपद्रव्यमूल्य,
याचीही सार्वत्रिक झलक आहे !
आपल्या विजयाची कल्पनाही,
पूर्णपणे अज्ञानमूलक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8682
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
13सप्टेंबर 2024

No comments:

निमताळेपणा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- निमताळेपणा नको त्या गोष्टी;नको तशा, जाती धर्मावरती नेल्या आहेत. जातीय आणि धार्मिक भावना, नको तेवढ्या कोम...