Thursday, September 26, 2024

प्रचार तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

प्रचार तंत्र

ना कसला विचार आहे,
ना कसला आचार आहे.
त्याचेच तर नाव,
निवडणूक प्रचार आहे.

प्रचारापेक्षा अपप्रचार,
उपयोगी पडला जातो.
प्रचाराचा रोग मग,
सर्वांनाच जडला जातो.

प्रचारापेक्षा अपप्रचारावर,
सर्वांचीच मदार आहे !
ज्याच्या त्याच्या विजयाचा,
अपप्रचारच आधार आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8694
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
26सप्टेंबर 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 4जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 216 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 4जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 216 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1YiLs6xcuGuSxIcFWrRP...