आजची वात्रटिका
--------------------------
सवयीचे गुलाम
नेता कोणताही असला तरी,
फक्त सत्ता हेच लक्ष आहे.
दरवेळी नवीन निवडणूक,
दरवेळीच नवा पक्ष आहे.
नवा पक्ष;नवी निवडणूक;
ऑफरसुद्धा भारी आहे.
या पक्षातून त्या पक्षात,
सगळ्यांचीच वारी आहे.
उमेदवारापासून मतदारापर्यंत,
कुणालाच काही वाटत नाही !
विजयी असोत वा पराभूत,
कुणाकडूनच सवय सुटत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8696
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28सप्टेंबर 2024
No comments:
Post a Comment