Sunday, September 15, 2024
धार्मिक भ्रष्टाचार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका--------------------------
धार्मिक भ्रष्टाचार
धर्माची चिकित्सा केली तरी,
तो धर्माचा अपमान वाटू लागला.
किरकोळ किरकोळ गोष्टीवरून,
आजकाल धर्म बाटू लागला.
चिकित्सेचा आणि प्रश्नांचा,
धर्माला वावडे आणि बाट आहे.
मी म्हणजेच अंतिम सत्य,
असा धर्मा-धर्माचा थाट आहे.
धर्माची सार्वजनिक चर्चा नको,
धर्म अत्यंत खाजगी गोष्ट आहे !
जो धार्मिक चिकित्सा करेल,
तो धर्मद्रोही आणि शिष्ट आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8684
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15सप्टेंबर 2024
Subscribe to:
Post Comments (Atom)
दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...
-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...

No comments:
Post a Comment