Saturday, September 14, 2024

लाडक्या बहिणीचे वास्तव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

लाडक्या बहिणीचे वास्तव

लोकांना जशी जनाची आहे,
तशी लोकांना मनाची आहे.
लोक लोकांना विचारू लागले,
लाडकी बहीण कुणाची आहे?

लाडक्या बहिणीच्या जाहिरातीत,
युतीतला भेदभाव दिसतो आहे.
भेदभाव करून नामानिराळे,
मनात वेगळाच डाव दिसतो आहे.

कुणी का स्वतःला भाऊ म्हणेना,
जो तो स्वतःच्या प्रचारात धुंद आहे !
लाडक्या बहिणीचा तर,
फक्त ओवाळणीशीच संबंध आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8683
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
14सप्टेंबर 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...