आजची वात्रटिका
--------------------------
फिट्टम् फाट
महायुती असो वा महाआघाडी,
नाव मोठे लक्षण खोटे आहे.
एकमेकांचा उद्धार करण्यात,
सगळ्यांचेच साटेलोटे आहे.
परस्परांचा उद्धार करीत,
राजकीय इज्जत काढू लागले.
राजकारणात रस नसणाऱ्यांचीही,
राजकीय लज्जत वाढू लागले.
विधानसभेच्या तोंडावरती,
बेताल वक्तव्यांचा नाट आहे !
अगदी चक्रवाढ व्याजासहित,
रोखठोक फिट्टम फाटआहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8688
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
20सप्टेंबर 2024
No comments:
Post a Comment