आजची वात्रटिका
--------------------------
बॅनरबाजी
ज्याच्या त्याच्या राजकीय निष्ठेचे,
अगदी वेगवेगळे स्कॅनर आहे.
म्हणूनच भावी मुख्यमंत्र्यांचे,
रोज कुठे ना कुठे नवे बॅनर आहे.
आपला उत्साह आणि वास्तव,
याची कुठे कुणाला जाण आहे ?
आपला महाराष्ट्र म्हणजे,
भावी मुख्यमंत्र्यांची खाण आहे.
अतिउत्साह आणि उतावळेपणा,
याची चौका चौकात झांकी आहे !
आता फक्त अपक्षांनीच,
आपले बॅनर लावणे बाकी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8698
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
30सप्टेंबर 2024
No comments:
Post a Comment