आजची वात्रटिका
--------------------------
नाकारलेली ऑफर
राजकारणातही जे 'नितीनं' वागतात,
त्यांचे नाव गडकरी आहे.
जे राजकारणात गडबड करतात,
त्यांचे नाव गडबडकरी आहे.
ज्याला मतभिन्नतेचे मतही,
अगदी उघडपणे स्वीकारता येते.
फक्त त्याला आणि त्यालाच,
कुठलीही ऑफर नाकारता येते.
गडकरींचा स्पष्टवक्तेपणा म्हणजे,
महाआघाडीमध्ये नवी फुणगी आहे !
पंतप्रधानपदाची नाकारलेली ऑफर,
महाआघाडीसाठी नवी ठिणगी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8685
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
16सप्टेंबर 2024
No comments:
Post a Comment