आजची वात्रटिका
--------------------------
चरबीयुक्त लाडू
तीर्थ तर वादग्रस्त होतेच,
आता वादग्रस्त प्रसाद आहे,
लाडूतल्या कोलेस्ट्रॉलचा,
भावनिक असा वाद आहे.
बैल गेला झोपा केला,
असाच काहीसा भास आहे.
लाडूमधल्या चरबीला,
राजकारणाचाही वास आहे.
दृष्टीआड सृष्टी असते,
यातच सगळे सामावले आहे !
भक्तांमध्ये अपराधाची भावना,
कमावलेले पुण्य गमावले आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8690
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
22सप्टेंबर 2024
No comments:
Post a Comment