आजची वात्रटिका
--------------------------
कावळ्याची नजर
तुमच्या आमच्या नजरा,
तेव्हा नक्की चोरट्या असतात.
जेव्हा वृद्धाश्रमांच्या दारात,
कावळ्यांच्या घिरट्या असतात.
पितृ पाठाच्या पंधरवड्यात,
जेव्हा पित्रं जेवू लागतात.
तेव्हा छद्मी हास्य करीत,
कावळे कावकावू लागतात.
आपल्या पित्रांच्या नावाने,
आपला प्रासंगिक गजर आहे!
त्यालाच विसंगती दिसते,
ज्याची कावळ्याची नजर आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8689
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
21सप्टेंबर 2024
No comments:
Post a Comment