आजची वात्रटिका
--------------------------
संशयास्पद
मोर्चे आणि आंदोलनांना,
निवडणुकांच्या तोंडावर जोर येतो.
मागण्या आणि आश्वासनांना,
सगळीकडून सारखाच भर येतो.
मोर्चे आणि आंदोलनांचा,
एकच धुराळा उडला जातो,
निवडणुकांच्या तोंडावरती,
बॅकलॉग भरून काढला जातो.
देणारे तेच मागणारे तेच,
आंदोलन फुगवलेला फुगा असते!
सगळे कसे आयोजित प्रायोजित,
संशयाला खूप मोठी जागा असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8692
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
24सप्टेंबर 2024
No comments:
Post a Comment