आजची वात्रटिका
--------------------------
महायुतीचे देखावे
कुठे एकीचे;कुठे बेकीचे,
गणपतीपुढे देखाव्यावर देखावे,
महायुतीच्या देखाव्यांना,
सांग आपण कसे बरे रोखावे ?
ज्याने त्याने आपले अस्तित्व,
देखाव्यामधून जपले आहे .
इथे आमचे काहीच नाही,
जे ते सगळेच आपापले आहे.
जशी आहे लाडकी बहीण,
तसा बाप्पासुद्धा लाडका आहे !
श्रेयवादाच्या स्पर्धेला,
देखाव्यांचा खमंग तडका आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8677
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8सप्टेंबर 2024
No comments:
Post a Comment