Monday, September 2, 2024

पुतळ्यांचे दुःख...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

पुतळ्यांचे दुःख

जसे त्यांना दुःख झाले,
तसेच सगळ्यांनाच दुःख होते.
जोडे मारो आंदोलन बघून,
चौकातले पुतळे मख्ख होते.

चौका चौकातल्या पुतळ्यांना,
मख्ख उभे राहावे लागते.
ज्याची कल्पनाही केली नाही,
असेच सगळे पहावे लागते.

पुतळ्यांच्या दुःखापुढे,
तुमचे आमचे दुःख फिके आहे !
सगळ्याच पुतळ्यांचे दुःख,
जेवढे बोलके तेवढेच मुके आहे!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8671
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
2 सप्टेंबर 2024
 

No comments:

निमताळेपणा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- निमताळेपणा नको त्या गोष्टी;नको तशा, जाती धर्मावरती नेल्या आहेत. जातीय आणि धार्मिक भावना, नको तेवढ्या कोम...