आजची वात्रटिका
--------------------------
जाहिरात संपादन
यांनी केलेल्या जाहिरातीमधून,
त्यांच्या चेहऱ्यावरती काट आहे.
महायुतीच्या प्रचाराला,
घटक पक्षांतूनच नाट आहे.
ज्याला जशी पाहिजे आहे तशी,
जाहिरात एडिट करायला लागले.
जे ते स्वतःच सरकारी योजनांचे,
जाहीरपणे क्रेडिट मारायला लागले.
नाव महायुती असले तरी,
त्यांची स्वतःवर जास्त प्रीती आहे.!
सहन होईना; सांगताही येईना,
महायुतीतल्या घटकांची कृती आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8675
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
6सप्टेंबर 2024
No comments:
Post a Comment