Friday, January 31, 2025

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 243वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 243वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे


 

सन्नाटा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

सन्नाटा

अखेर उशिरा का होईना,
मनसेला एकदाची जाग आहे.
विधानसभेच्या निकालावरती,
रेल्वे इंजिनाची आग आग आहे.

पुन्हा एकदा तोंड बदलून,
इंजिन आग ओकायला लागले.
काल ज्यांचे ज्यांचे कौतुक केले,
त्यांनाच इंजिन ठोकायला लागले.

आपल्या भूमिकांतराचे कारण,
पुराव्यासहित प्रचारू लागले !
इतना सन्नाटा क्यों है भाई?
सैनिक सैनिकांना विचारू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8815
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
31जानेवारी 2025
 

Thursday, January 30, 2025

निक वात्रटिका l 30जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 242 वा l पाने -51


निक वात्रटिका l 30जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 242 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे


 

Wednesday, January 29, 2025

दैनिक वात्रटिका l 29जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 241 वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 29जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 241 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

राजीनामा मागणी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

राजीनामा मागणी

राजीनामा मागणे सोपे,
राजीनामा देणे अवघड असते.
नैतिकता दाखविणे सोपे,
राजीनामा घेणे अवघड असतते.

सकारण आणि अकारण,
राजीनामा मागितला जातो.
स्वतः बरोबर इतरांचाही,
नैतिक संयम बघितला जातो.

राजीनामा देण्या घेण्यावरून,
राजकीय खळबळ माजलेली असते !
राजीनामा द्यायचा तरी कसा?
पदासाठी किंमत मोजलेली असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8813
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
29जानेवारी 2025
 

Tuesday, January 28, 2025

दैनिक वात्रटिका l 28जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 240 वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 28जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 240 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

पक्षांतराचे चक्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

पक्षांतराचे चक्र

गेलेले परत यायला लागले,
आलेले परत जायला लागले.
ज्याच्या त्याच्या पक्षांतराचे,
चक्र पूर्ण व्हायला लागले.

निवडणुकांच्या मोसमावरती,
पक्षांतराचे चक्र फिरत असते.
पक्षांतराचे चक्रीय वारे,
पक्षीय छावणीत शिरत असते.

कधी उलट;कधी सुलट,
पक्षांतर चक्राची गती असते !
पक्षांतराच्या राजकीय यज्ञात,
राजकीय निष्ठा सती असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8812
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28जानेवारी 2025
 

Monday, January 27, 2025

दैनिक वात्रटिका l 27जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 239 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 27जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 239 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

#

 

Sunday, January 26, 2025

दैनिक वात्रटिका l 26जानेवारी 2025वर्ष- चौथे..अंक - 238 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 26जानेवारी 2025
वर्ष- चौथे..
अंक - 238 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे..


 

प्रजासत्ताकाचे अपहरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

प्रजासत्ताकाचे अपहरण

लोकशाहीचेच शस्त्र आहे,
लोकशाहीचीच ढाल आहे.
प्रजासत्ताक राज्याकडे सोडून,
खुर्चीसत्ताकाकडे वाटचाल आहे.

प्रजेसाठी सोडून खुर्चीसाठीच,
सगळा काही आटापिटा आहे.
हे राज्य प्रजेचे व्हावे...
सगळा प्रचारच खोटानाटा आहे.

प्रजासत्ताकाची चालली गळचेपी,
प्रजासत्ताकाचे अपहरण आहे !
या सगळ्या अधोगतीला,
प्रजा हेच तर प्रमुख कारण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8811
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
26जानेवारी 2025
 

Saturday, January 25, 2025

दैनिक वात्रटिका l 25जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 237 वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 25जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 237 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

निष्ठेची शिकवण..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

निष्ठेची शिकवण

एक जात सगळे गद्दार,
निष्ठेच्या अफवा उठू लागले.
एक जात सगळे गद्दार,
परस्परांना निष्ठा शिकवू लागले

इतरांना निष्ठा शिकवताना,
सारखेपणा राखला आहे.
आपापल्या पक्षीय निष्ठेचा,
गद्दारांकडून दाखला आहे.

सगळा विरोधाभास बघताना,
आपल्याला हसू फुटू लागले !
आपणच निष्ठावंत असल्याचे,
सर्वच गद्दारांना वाटू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8810
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
25जानेवारी 2025
 

Friday, January 24, 2025

दैनिक वात्रटिका l 24जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 236 वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 24जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 236 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

चेक रियालिटी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
चेक रियालिटी
पक्षीय चिरफाड करूनसुद्धा,
नव्या ऑपरेशनची वार्ता आहे.
जो काल सुत्रधार होता,
तोच पुन्हा कर्ता धर्ता आहे.
फोडा आणि राज्य करा,
हा तर इंग्रजांचा फंडा आहे
लोकशाहीच्या मार्गानेच,
हा लोकशाहीला गंडा आहे.
फोडा आणि राज्य करा,
या दरवेळीच नवी मेख आहे !
जुन्या राजकीय मित्रांना,
नव्या मित्रांकडून चेक आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8809
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
24जानेवारी 2025

 

Thursday, January 23, 2025

दैनिक वात्रटिका l 23जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 235 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 23जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 235 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.


 

कॉपी शपथ सांगतो..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

कॉपी शपथ सांगतो..

परीक्षा देणाऱ्या आणि घेणाऱ्यावर,
पुन्हा एकदा नसती आफत आहे.
इच्छा असली आणि नसली तरीही
सक्तीने कॉपीमुक्तीची शपथ आहे.

कितीतरी शपथा घेतल्या गेल्या,
तरीही कॉपीमुक्ती झालेली नाही.
कुणाचीही कॉपी मुक्तीची शपथ,
अजूनही वास्तवात आलेली नाही.

शपथ देणाऱ्यांची आणि घेणाऱ्यांची,
खरोखरच आम्हाला कीव आहे !
प्रत्येक परीक्षेला कॉपी सांगते,
मी अपरिहार्य आणि चिरंजीव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8808
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
23जानेवारी 2025
 

Wednesday, January 22, 2025

दैनिक वात्रटिका l 22जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 234 वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 22जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 234 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

भ्रष्टाचार आणि मान्यता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

भ्रष्टाचार आणि मान्यता

जशी भ्रष्टाचाराशिवाय योजना नाही,
तसा योजनेशिवाय भ्रष्टाचार नाही.
भ्रष्टाचाराच्या व्यापकतेचे,
याच्यासारखे कोणतेच सार नाही.

मान्य असो वा अमान्य,
भ्रष्टाचार आज लोकमान्य आहे.
जो देत नाही आणि खात नाही,
त्याची तर खरोखरच धन्य आहे.

लोकमान्यताआणि सरकारमान्यता,
हेच भ्रष्टाचाराचे खरे टॉनिक आहे !
तेरी भी चुप मेरी भी चुप,
भ्रष्टाचार म्हणजे झाकले माणिक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8807
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22जानेवारी 2025
 

Tuesday, January 21, 2025

दैनिक वात्रटिका l 21जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 233 वा l पाने -48


दैनिक वात्रटिका l 21जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 233 वा l पाने -48
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

नव्या भूकंपाचे संकेत...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

नव्या भूकंपाचे संकेत

जसे नाराजी नाट्याचे अंक,
पुन्हा सादर व्हायला लागले.
तसे राजकीय भूकंपाचे,
नवे संकेत यायला लागले.

नव्या राजकीय भूकंपाचे,
दाव्यावरती नवे दावे आहेत.
भूकंपाचे अंदाज म्हणजे,
कुणाचे राजकीय कावे आहेत.

जिकडे तिकडे पसरलेली,
राजकीय भूकंपाची कीर्ती आहे!
नव्या भूकंपाचा केंद्रबिंदू,
म्हणे जुन्याच जागेवरती आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8806
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
21जानेवारी 2025
 

Monday, January 20, 2025

दैनिक वात्रटिका l 20जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 232 वा l पाने -48


दैनिक वात्रटिका l 20जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 232 वा l पाने -48
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

बंदुक्या - पिस्तुल्याचा संवाद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

बंदुक्या - पिस्तुल्याचा संवाद

बंदुक्या म्हणाला पिस्तुल्याला,
आता मात्र खरोखरच हद्द आहे.
तुझ्याबरोबर माझा सुद्धा,
सरकारी शस्त्र परवाना रद्द आहे.

गावठी कट्ट्याचा घोडेबाजार,
चोरून लपून तेजीत आहे.
वाढदिवसाचे केक कापण्यासाठी,
कुणी तलवारीला पाणी पाजीत आहे.

आपली दहशत माजविण्यासाठीच,
शस्त्र परवान्याचे रिवाज आहेत !
ढीशक्याव.....ढीशक्याव...असे,
सोशल मीडियावर आवाज आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8805
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
20जानेवारी 2025
 

Sunday, January 19, 2025

दैनिक वात्रटिका l 19जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 231 वा l पाने -48


दैनिक वात्रटिका l 19जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 231 वा l पाने -48
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

पालकमंत्री पद ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

पालकमंत्री पद

पालकमंत्री पदाच्या शर्यतीचे,
प्रकार तसे एकदम रास्त आहेत,
त्याचे खरे कारण असे,
जिल्हे कमी; मंत्री जास्त आहेत.

कुणी कुणी एक सोडून,
दोन जिल्ह्यांचा मालक आहे.
आपल्या सोडून इतरांच्या,
जिल्ह्याचा कुणी पालक आहे.

कुणाची खुशी;कुणाची नाराजी,
प्रकार गृहीत धरावे लागतील !
सगळ्यांनाच खुश करण्यासाठी,
नवीन जिल्हे करावे लागतील !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8804
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
19जानेवारी 2025
 

Saturday, January 18, 2025

दैनिक वात्रटिका l 18जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 230 वा l पाने -48


दैनिक वात्रटिका l 18जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 230 वा l पाने -48
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

फसवा फसवी ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

फसवा फसवी

आपणच खरे असल्याचा,
जो तो जोरात ठसवतो आहे.
ज्याला त्याला माहिती असते,
आपण लोकांना फसवतो आहे.

फसायला आणि फसवायला,
हल्ली सगळ्यांनाच आवडते आहे.
फसवाफसवीच्या खेळाचा मार्ग,
अगदी आवडीने निवडते आहे.

त्यामुळेच जिकडे बघावे तिकडे,
आज फसवे एके फसवे आहेत !
तेरी भी चूप मेरी भी चुप,
सगळेच बाजार बसवे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8803
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
18जानेवारी 2025
 

Friday, January 17, 2025

दैनिक वात्रटिका l 17जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 229 वा l पाने -48

दैनिक वात्रटिका l 17जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 229 वा l पाने -48
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे



 

पक्षनिधी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

पक्षनिधी

कधी लपून छपून तर,
कधी उघड उघड लुटले जाते
वसुली केलेल्या खंडणीला,
हल्ली पक्षनिधी म्हटले जाते.

जसा पक्षनिधी वाटला जातो,
तसा पक्षनिधी लाटला जातो.
बॉण्डवर लिहून देऊ का?
पक्षनिधी कसा वटला जातो.

कुणाचा निधी दुर्लक्षित,
कुणाचा मात्र लक्षवेधी असतो !
कायदेशीर आणि बेकायदेशीर,
पक्षनिधीचा विधी असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8802
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
17जानेवारी 2025
 

Thursday, January 16, 2025

दैनिक वात्रटिका l 16जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 228वा l पाने -48


दैनिक वात्रटिका l 16जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 228वा l पाने -48
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

समर्थक जिंदाबाद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

समर्थक जिंदाबाद

तुकडे फेकता आले की,
तुम्हाला समर्थकांची कमी नाही.
समर्थक तयार करता येतात,
यासारखी युक्तीही नामी नाही.

शेवटी समर्थक कुणाचेही असोत,
समर्थक हे समर्थक असतात.
चांगल्या वाईटाचे परिणाम,
त्यांच्यासमोर निरर्थक असतात.

नेहमीच समर्थनाच्या नशेमध्ये,
सगळेच समर्थक धुंद असतात !
त्यांना वाटते ते कट्टर आहेत,
वास्तवात मात्र ते अंध असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8801
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
16जानेवारी 2025
 

Wednesday, January 15, 2025

दैनिक वात्रटिका l 15जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 227वा l पाने -48


दैनिक वात्रटिका l 15जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 227वा l पाने -48
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

पक्ष परिवर्तन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

पक्ष परिवर्तन

आघाडी -युतीच्या राजकारणामुळे,
सगळेच पक्ष सारखेच वागू लागले.
एकमेकांचे वाण तर लागलेच लागले,
पण एकमेकांचे गुणही लागू लागले.

सत्तेसाठी वाटेल ते म्हणता म्हणता,
जणू पश्चातापाची पाळी आली आहे.
कुणाचा म्हणे झाला भाजपा तर,
कुणाची म्हणे काँग्रेस झाली आहे.

कुणाच्या पक्षाचे काय झाले?
त्यांचेच जगजाहीर ढोल आहेत !
ही काही आमची थापालॉजी नाही,
हे त्यांच्याच अनुभवाचे बोल आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8800
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
15 जानेवारी 2025
 

Tuesday, January 14, 2025

दैनिक वात्रटिका l 14जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 226वा l पाने -48


दैनिक वात्रटिका l 14जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 226वा l पाने -48
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

राजकीय पातळी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

राजकीय पातळी

राजकारणाची मान मर्यादा,
सगळ्यांकडूनच विसरली आहे.
जशी राजकारणाची पातळी घसरली,
तशी टीकेची पातळीही घसरली आहे.

आपल्या अचकट विचकट शब्दांनी,
त्यांचे थेट कमरेखालीच वार आहेत.
राजकारणाच्या घसरत्या पातळीचे,
सगळे सारखेच गुन्हेगार आहेत.

कालच्या घसरलेल्या पातळीवर,
रोज नव्याने कुणाची तरी मात आहे !
राजकारणाची घसरती पातळी,
रोजच्या रोज खाली खाली जात आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8799
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
14 जानेवारी 2025
 

Monday, January 13, 2025

दैनिक वात्रटिका l 13जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 225वा l पाने -48


दैनिक वात्रटिका l 13जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 225वा l पाने -48
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

स्थानिक अडचण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

स्थानिक अडचण

महाविकास आघाडीत,
पुन्हा स्वबळाची भाषा आहे.
स्वबळाचे तीन तेरा वाजले,
तरीही स्वबळाचा धोशा आहे.

तिसरी आघाडी फुटली तरी,
घोषणा व्हायची बाकी आहे.
प्रत्येकाच्या हालचाली म्हणजे,
फुटीचीच तर झांकी आहे.

तिसऱ्या आघाडीच्या अवस्थेमुळे,
जो तो भलताच पॅनिक आहे !
राष्ट्रीय आणि प्रादेशिकतेपेक्षा,
खरी अडचण स्थानिक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8798
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
13 जानेवारी 2025
 

Sunday, January 12, 2025

दैनिक वात्रटिका l 12जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 224वा l पाने -48


दैनिक वात्रटिका l 12जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 224वा l पाने -48
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

दो जिस्म मगर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

दो जिस्म मगर...

राजकारण आणि गुन्हेगारी,
परस्परांचे जन्मदाते आहेत.
कोण आई आहे?कोण बापआहे?
एवढे नात्यांमध्ये गोते आहेत.

काढायचे म्हटले तरी,
दोघांना वेगळे काढता येत नाही.
अगदी लढायचे म्हटले तरी,
दोघांना वेगळे लढता येत नाही.

दो जिस्म मगर एक जान है हम,
अशीच काहीशी अवस्था आहे !
परस्परांच्या सुख-सोयीसाठीच,
सगळी कायदेशीर व्यवस्था आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8797
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
12जानेवारी 2025
 

Saturday, January 11, 2025

दैनिक वात्रटिका l 11जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 223वा l पाने -48


दैनिक वात्रटिका l 11जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 223वा l पाने -48
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

बिनधास्त आणि बेधडक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

बिनधास्त आणि बेधडक

जस जसा खळखळाट वाढला,
तसे राजकारण उथळ होऊ लागले.
ज्याचे त्याचे राजकारण,
अगदी ठळकपणे ओळखू येऊ लागले.

अशी एकही गोष्ट उरली नाही,
जिचा राजकारणात मुडदा नाही.
राजकारण लपून-छपून करायची गोष्ट,
आज त्याला कसलाच आडपडदा नाही.

सारे काही बिनधास्त आणि बेधडक,
सांगा कुणाला कुणाची भीती आहे ?
उथळ आणि सवंग राजकारणात,
अगदी नको नको त्याचीही माती आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8796
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
11जानेवारी 2025
 

Friday, January 10, 2025

निक वात्रटिका l 10जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 222 वा l पाने -48


दैनिक वात्रटिका l 10जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 222 वा l पाने -48
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

उडत्या तबकड्या..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

उडत्या तबकड्या

कुठे व्ह्यूअर्स मिलियन आहेत,
कुठे व्ह्यूअर्स बिलियन आहेत,
सोशल मीडियावर जिकडेतिकडे,
फक्त एलियन एके एलियन आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या,
सौजन्याने ह्या गोष्टी घडू लागल्या.
नववर्षाचे निमित्त साधून,
उडत्या तबकड्या उडू लागल्या.

कुठे एलियन हवेतून तर,
कुठे एलियन पाताळातून येत आहेत !
ज्याला जसा पाहिजे तसा,
एलियन्सचा अनुभव घेत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8795
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
10जानेवारी 2025
 

Thursday, January 9, 2025

दैनिक वात्रटिका l 9जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 221 वा l पाने -48


दैनिक वात्रटिका l 9जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 221 वा l पाने -48
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

बदलता पवित्रा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

बदलता पवित्रा

राजकारणाचे खरेखुरे रंग,
तेव्हाच कळायला लागतात.
जेव्हा फ्रंट फुटवर खेळणारे,
बॅक फुटवर खेळायला लागतात.

काल लावले चौकार-षटकार,
आज टिकी टिकी खेळावे लागते.
जेवढा चेंडूसुद्धा वळत नाही,
त्याहूनही जास्त वळावे लागते.

ज्यांनीनी गायली बंडाची गाणी,
त्यांना एकतेचे गीत गावे लागते !
कधी पडते हिट विकेट,
कधी रिटायर हर्ट व्हावे लागते !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8794
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
9जानेवारी 2025
 

Wednesday, January 8, 2025

दैनिक वात्रटिका l 8जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 220 वा l पाने -48


दैनिक वात्रटिका l 8जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 220 वा l पाने -48
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

वेडी आशा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

वेडी आशा

जसा न्याय खरीदला जातो,
तसा न्याय विकला जातो.
न्याय मिळेल या आशेवरती,
न्यायसुद्धा टिकला जातो.

कितीही अन्याय झाला तरी,
पुन्हा न्यायाचीच आशा असते.
सगळ्या मर्यादा संपल्या तरी,
पुन्हा न्यायाची भाषा असते.

न्यायातसुद्धा अन्याय दडलेला,
हीच न्यायाची खुबी आहे !
न्यायाच्या विश्वासावरतीच,
आज न्यायव्यवस्था उभी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8793
वर्ष -25 वे
दैनिक झुंजार नेता
8 जानेवारी 2025
 

Tuesday, January 7, 2025

दैनिक वात्रटिका l 7जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 219 वा l पाने -48

दैनिक वात्रटिका l 7जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 219 वा l पाने -48
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

नैतिक जबाबदारीचे वास्तव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

नैतिक जबाबदारीचे वास्तव

नैतिक जबाबदारी ही गोष्ट,
कधीच इतिहास जमा झाली आहे.
एवढी सारी निगरगट्टता,
आज सगळीकडे आली आहे.

जी गोष्ट इतिहास जमा झाली,
तिला राजकारणात शोधू लागले.
आपापला राजकीय स्वार्थ,
सगळे मिळून साधू लागले.

ज्यांना जबाबदारीच कळत नाही,
त्यांच्याकडून नैतिकतेचा हट्ट आहे !
कपड्याच्या आत सगळेच नागडे,
ही म्हण इथे एकदम फिट्ट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8792
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
7 जानेवारी 2025
 

Monday, January 6, 2025

दैनिक वात्रटिका l 6जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 218 वा l पाने -48


दैनिक वात्रटिका l 6जानेवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 218 वा l पाने -48
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

बगल आणि बच्चे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

बगल आणि बच्चे

कुणी कच्चे;कुणी बच्चे,
कुणी कुणी मात्र सच्चे आहेत.
ज्यांनी त्यांनी पोसलेले,
आपापले बगलबच्चे आहेत.

बगलबच्चाच्याच खांद्यावरती,
ज्याची त्याची मदार आहे.
त्यांचा खेळ रोखीचा असतो,
इतरांचा खेळ मात्र उधार आहे.

गॉडफादरच्या अधिकाराला,
बगलबच्चाकडून बगल आहे !
तेच तेवढे शहाणे असतात,
बाकी जमाना जणू पागल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8791
दैनिक झुंजार नेता
वर्ष -25 वे
6 जानेवारी 2025
 

दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 309 वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 309 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Xo0K3gNi...