Sunday, March 2, 2025

दैनिक वात्रटिका l 2 मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 273 वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 2 मार्च 2025
वर्ष- चौथे
अंक - 273 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका

 

मोबाईल गाथा..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

मोबाईल गाथा

घरोघरी आणि दारोदारी,
सर्व चित्रं अगदी कॉमन आहेत.
जसे मोबाईल मॅन आहेत,
तशा मोबाईल वुमन आहेत.

जोडीला मोबाईल गर्ल आहेत,
जोडीला मोबाईल बॉय आहेत.
मोबाईल झाला सहावे ज्ञानेन्द्रिय,
हॅलो सोबत फक्त हाय आहेत.

मोबाईल शाप की वरदान?
तोंड दाबून बुक्क्यांचे मार आहेत !
माणसांच्या हाती मोबाईल तरी,
मोबाईल माणसांवर स्वार आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8845
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
2 मार्च2025
 

Saturday, March 1, 2025

दैनिक वात्रटिका l 1 मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 272वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 1 मार्च 2025
वर्ष- चौथे
अंक - 272वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/19qjdDU-k7rrrCsxf3nt9eVn7uxJna9vW/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका

 

व्यवस्था शुद्धीकरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

व्यवस्था शुद्धीकरण

आपली व्यवस्था सडलेली आहे,
आपली व्यवस्था किडलेली आहे.
सडलेल्या किडलेल्या व्यवस्थेने,
सामान्य जनता वेढलेली आहे.

आपली व्यवस्था सडवणारे,
आपलेच सडके लोक आहेत.
आपली व्यवस्था किडवणारे,
आपलेच किडके लोक आहेत.

व्यवस्था शुद्धीकरणाचे दावे,
तोपर्यंत तरी फुसके आहेत !
जोपर्यंत व्यवस्थेच्या आत बाहेर,
फक्त नासके आणि नासके आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8844
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
1 मार्च2025
 

दैनिक वात्रटिका l 2 मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 273 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 2 मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 273 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1AFjhrSRAKaH4veYCmfq4Q...