Saturday, April 5, 2025

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57


दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक
आजचा अंक 
दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025
वर्ष- चौथे
अंक - 306 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.

मराठी भाषेत सामाजिक भाष्य, व्यंगचित्रे आणि परखड विचारांना एक अनोखे व्यासपीठ देणारे दैनिक वात्रटिका हे मराठी वात्रटिकांच्या क्षेत्रातील पहिले आणि एकमेव ऑनलाइन दैनिक आहे. या दैनिकाचे संपादक सूर्यकांत डोळसे, जे एक प्रसिद्ध सामाजिक भाष्यकार, लोकप्रिय कवी, मराठी ब्लॉगर आणि ई-साहित्यिक म्हणून ओळखले जातात, यांनी मराठी वाचकांसाठी हे खास माध्यम निर्माण केले आहे. गेल्या १९ वर्षांपासून दैनिक पुण्यनगरीत "चिमट" आणि दैनिक झुंजार नेता च्या पहिल्या पानावर गेली 25 वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या  "फेटफटका" या त्यांच्या वात्रटिका स्तंभांनी वाचकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या सर्जनशीलतेला आता दैनिक वात्रटिकाच्या रूपाने नवे पंख मिळाले आहेत.

दैनिक वात्रटिका हे केवळ वात्रटिका आणि  व्यंगचित्रांचे संकलन नाही, तर समाजातील विविध पैलूंवर भाष्य करणारे, विचारांना चालना देणारे आणि वाचकांना हसवताना अंतर्मुख करणारे एक प्रभावी माध्यम आहे. सूर्यकांत डोळसे यांच्या लेखणीतून साकारलेली ही व्यंगचित्रे आणि कविता कमी शब्दांत मोठा आशय व्यक्त करतात. त्यांच्या खास शैलीतून सामाजिक विडंबन, राजकीय टिप्पणी आणि सांस्कृतिक संदर्भ यांचा सुंदर संगम दिसतो. याशिवाय, त्यांचे परखड विचार आणि पुरोगामी दृष्टिकोन या दैनिकाला एक वेगळी ओळख देतात.

या दैनिकात प्रकाशित होणारी प्रत्येक वात्रटिका ही वाचकांना समाजाचे प्रतिबिंब दाखवते. मग तो गंभीर विषय असो वा हलकाफुलका प्रसंग, सूर्यकांत डोळसे यांची कल्पकता आणि शब्दकौशल्य यामुळे प्रत्येक रचना वाचकांच्या मनात ठसते. विशेष म्हणजे, हे दैनिक ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध असल्याने, मराठी वाचकांना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून ते सहज वाचता येते. सोशल मीडियावरही या वात्रटिका शेअर करण्याची मुभा आहे, फक्त संपादकांचे नाव आणि श्रेय देण्याची अपेक्षा आहे.

वाचकांना आवाहन:
प्रिय वाचकांनो, मराठी भाषेची श्रीमंती आणि व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजदर्शनाचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल, तर दैनिक वात्रटिका नक्की वाचा. सूर्यकांत डोळसे यांच्या या अनमोल साहित्यकृतीचा आनंद घ्या, आपले विचार मांडा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत या दैनिकाला शेअर करून मराठी वात्रटिकांचा हा वारसा पुढे न्या. रोजच्या धावपळीत एक छोटा विराम घेऊन, हसत-हसत विचार करायला लावणाऱ्या या दैनिकाला आपल्या जीवनाचा हिस्सा बनवा. चला, 
आजच दैनिक वात्रटिका वाचायला सुरुवात करूया!

 

सेम टू सेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

सेम टू सेम

कधी कधी ढकला ढकली असते,
कधी कधी बुकला बुकली असते.
सगळ्यांचेच राजकीय वर्तन,
अगदी एकसारखेच नकली असते.

सगळी फसवाफसवी करूनही,
त्यांना जनता फसली वाटत नाही.
त्यांचे असली वर्तनसुद्धा,
जनतेला कधी असली वाटत नाही.

सगळी फसवाफसवी बनवाबनवी,
तरी सोज्वळपणाचा आव असतो !
सगळेच चोर जमा झाली की,
चोरांच्या राज्यात चोरसुद्धा सावअसतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8878
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
5एप्रिल2025
 

Friday, April 4, 2025

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 305वा l पाने -57


दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025
वर्ष- चौथे
अंक - 305वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1VDZIPmnz1bKXOaj5nbZg9-z7BlrjCpX9/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका

 

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

बोलून चालून ते गिबली आहे

सगळी दुनिया गिबली फोटोसाठी,
फोटोसाठी राब राब राबली आहे.
लोकांनी दिले काय? आले काय?
बोलून चालून ते गिबली आहे.

कुठे नवरा किंवा बायको गायब,
कुठे बंटीच्या ऐवजी बबली आहे.
गिबलीचे चित्र विचित्र इफेक्ट बघून,
कुणी दाताखाली जीभ दाबली आहे.

कुणाचे दाढी बरोबर चष्मे गायब,
यंग ब्रिगेडची सिल्वर ज्युबली आहे !
कृत्रिमतेपुढे बुद्धीमत्ता झाली स्तब्ध,
बोलून चालून ते गिबली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8877
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
4 एप्रिल2025
 

Thursday, April 3, 2025

दैनिक वात्रटिका l 3 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 304वा l पाने -57


दैनिक वात्रटिका l 3 एप्रिल2025
वर्ष- चौथे
अंक - 304वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1UnMJprcXoo-3OmdsQbbOquaFBsz-aPca/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका


 

विकासाचा देखावा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
विकासाचा देखावा
वास्तवाला अवास्तवाचा,
बेमालूम मुलामा दिला जातो.
भकास नावाचा कार्यक्रम,
विकास म्हणून उभा केला जातो.
विकासाच्या देखाव्यालाच मग,
अगदी साग्र संगीत सजवले जाते.
जमा खर्चाचा ताळेबंद देऊन,
जुन्यालाच पुन्हा उजवले जाते.
ज्यांचे ज्यांचे हितसंबंध गुंतलेले,
ते बहिरे,मुके आणि अंध होतात !
असे कितीतरी वांझोटे विकास,
ऑडिटसह फाईलबंद होतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8876
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
3 एप्रिल2025

 

Wednesday, April 2, 2025

दैनिक वात्रटिका l 2 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 303वा l पाने -57


दैनिक वात्रटिका l 2 एप्रिल2025
वर्ष- चौथे
अंक - 303वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1TmT4KjN1PCO9HUFqTCR21TkW9XBFNFBy/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका

 

गटारगंगा .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
गटारगंगा
जायची तेवढी पातळी,
तळाला जाऊन टेकली आहे.
त्यांनी आपल्या राजकारणाची,
गटारगंगा करून टाकली आहे.
परस्परांच्या हातामध्ये,
परस्परांची राजकीय मेख आहे.
परस्परांच्या अंगावरती,
रोज नवी नवी चिखलफेक आहे.
रोज नवा धांगडधिंगा आहे,
रोज नवा राजकीय दंगा आहे!
आपण ज्याला गटार म्हणतो,
त्यांच्यासाठी तर ती गंगा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8875
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
2 एप्रिल2025

 

Tuesday, April 1, 2025

दैनिक वात्रटिका l 1 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 302वा l पाने -54


दैनिक वात्रटिका l 1 एप्रिल2025
वर्ष- चौथे
अंक - 302वा l पाने -54
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1SkPXCxtOjzZ2edMwBs_n2B9e3RduTRGC/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका

 

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

सोशल स्टेटस

आजच्यासारखा राजकीय स्वार्थ,
आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही.
शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्धा,
हल्ली कसलाच अर्थ राहिला नाही.

जसा शुभेच्छा देणाराही देतो आहे,
तसा शुभेच्छा घेणाराही घेतो आहे.
राजकारण आणि औपचारिकता,
यांचाच हा सगळा भाग होतो आहे.

आजकाल चेहऱ्या चेहऱ्यावरती,
हसरे मुखवटे लावले जात आहेत!
सोशल मीडियावर स्टोरी बरोबरच,
स्टेटस आणि डीपी ठेवले जात आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8874
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
1 एप्रिल2025
 

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...